Friday, September 1, 2017

दोन हुकलेल्या पद्मश्री सन्मानांची कथा -- रा. कृ. जोशी व मोहन तांबे

दोन हुकलेल्या पद्मश्री सन्मानांची कथा --
ही नावे रा. कृ. जोशी व मोहन तांबे ही होत. खालील कथा वाचून आपणही सहमत व्हाल.
मोहन तांबे १९८७ च्या आसपास सी-डॅकमधे आले व त्यांनी संगणकावर भारतीय भाषा यासाठी कामाला सुरुवात केली. त्या आधी टाइप राइटरवर असणारा रेमिंग्टन देवनागरी कीबोर्ड शिकायला ६ महिने लागत. त्या ऐवजी कखगघङ, चछजझञ, असा वर्णमाला-अनुसारी की-बोर्ड करायची कल्पना त्यांना सुचली. सर्वच भारतीय भाषांमधे व्यंजनाला स्वर जोडण्याची पद्धतही सारखीच -- म्हणजे क ला काना का, ब ला दीर्घ ऊकार बू ----वगैरे। त्याचाही उपयोग करता आला. या की-बोर्डाला त्यांनी इनस्क्रिप्ट हे नाव दिले.
एक मोठा प्रश्न असतो काढलेली अक्षरे सुबक व एकसारख्या वळणाची दिसण्याचा. त्यासाढी श्री रा. कृ. जोशींनी खूप श्रम घेतले व सुमारे ३० फॉण्टसेट देवनागरीसाठी तर इतरही प्रत्येक भारतीय लिपीसाठी १०-१५ वेगवेगळ्या वळणांचे फॉण्टसेट त्यांनी सी-डॅकला तयार करून दिले. या वळणांची दखल की-बोर्डला घ्यावी लागत नाही पण प्रिंटिंगच्या वेळी संगणकातील प्रोसेसर त्या प्रमाणे आदेश देतो.
खरा कळीचा मुद्दा असतो तो कोडिंगचा. संगणकाला फक्त हो आणि नाही (किंवा १ आणि ०) एवढे दोनच संकेत कळत असल्याने प्रत्येक मानवी अक्षरासाठी ८ संकेतांची एक एक संकेत-श्रृंखला ठरवून द्यावी लागते. असा सर्व अक्षरांचा व त्यांच्या संकेत-श्रृंखलेचा (म्हणजे कोडचा) एक चार्ट तयार करावा लागतो. दोन वेगवेगळ्या प्रोग्रामर्सचे चार्ट वेगवेगळे असतील तर त्यांना एकमेकांचे लेखन वाचता येणार नाही. म्हणून अशा सर्व कोडिंगमधे एकवाक्यता हवी. इंग्लिश अक्षरांसाठी ही एकवाक्यता १९७० च्या आसपासच ठरली होती -- त्याचे नाव ASCII CODE. सबब भारतीय लिप्यांसाठी ISCII CODE करण्याचे ठरले. ते थोडेफार केलेही. पण त्यांत खूप redundancies असल्याने ते वापरायला खूप स्पेस खर्च होते या सबबीवर शब्दरूप, अक्षर, या सारख्या त्या काळातील भारतीय टंकाच्या कंपन्या ते स्वीकारत नव्हत्या.
या मुळे ISCII CODE मधे १९८३-८५ मधे वारंवार बदल केले गेले असतील पण ते यशस्वी झाले नाही.
तांबेंनी जशी सोप्या की-बोर्डाची कल्पना लढवली तसेच ISCII CODE ला पूर्णपणे बाजूला सारून एक नवे व अतिशय सोपे कोडिंग बनवले. हे खूप अक्लिष्ट (सगळा क्लिष्टपणा काढून टाकलेले) कोडिंग आहे. ते त्यांनी १९९१ मधे BIS (bureau of indian standards) च्या गळी उतरवून त्याला मान्यता घेतली.
त्यामुळे राकृंच्या सर्व फॉण्टबँकेसह, सर्व भारतीय लिप्यांसाठी एकच कीबोर्ड असलेला आणि एका की-स्ट्रोकवरच एका लिपीतील मजकूर दुसऱ्या लिपीत उतरवू शकणारा असा एक प्रोग्राम तयार झाला जो त्या काळी ३००० ते ५००० या रेंजमधे विकूनही सी-डॅक फायद्यात राहिले असते आणि राकृंच्या व तांबेंच्या मेहनतीचे सार्थक झाले असते, पण....
इतर भारतीय टंकाच्या कंपन्या त्यांचे सॉफ्टवेअर १३००० ला विकतात तर आपणही तसेच करावे हा मोह सीडॅकला सुटला. BIS कडे दाखल करून झालेले कोडिंग सार्वजनिक असल्याने त्यावर कॉपी राइट सांगून एवढी किंमत जस्टिफाय करता आली नसती. म्हणून सी-डॅकने पुन्हा एक वेगळे व बऱ्याच रिडंन्डसी असलेले कोड तयार करवून घेतले आणि नवे भारतीय-भाषा सॉफ्टवेअर १४००० या किंमतीला विक्रीला काढले. त्याला जिस्ट, लीप व शेवटी इझम अशी नावे दिली. पुढे तांबे व त्यांच्या ज्यूनियर्सना देखील सी-डॅक सोडायला लावले (१९९६).
सगळीच भाषा सॉफ्टवेअर्स इतकी महागडी असल्याने सामान्य ग्राहकाला देशाची महागडी भाषा हवी की स्वस्त इंगरजी हवी असा पेच पडत होता व इंग्रजीचीच निवड होत होती. त्यामुळे या सर्वांचे मार्केट खूप डाउन होते. सी-डॅकचे त्याहूनही खाली. म्हणून ज्या राकृंचे व तांबेंचे काम १९९३ मधेच पद्मश्री मिळावी या तोडीचे होते त्यांना फक्त निराशा मिळाली.
१९९५ मधे इंटरनेट क्रांति आली. त्याचबरोबर चीनी व अरेबिक फॉण्ट वापरता यावेत ही मागणी वाढू लागली.त्यासाठी ८ ऐवजी १६ संकेतांच्या संकेत श्रृंखला कराव्या लागल्या. त्यासाठी ASCII CODE ऐवजी युनीकोड आले व त्यांनी जगातील सर्व लिप्यांसाठी कोडिंगचा मक्ता घेतला. भारतीय लिप्यांसाठी त्यांनी BIS ने सार्वजनिक केलेले कोडिंग स्वीकारले. तांबेंच्या प्रयत्नाचे थोडे तरी चीज झाले. पण पुन्हा दोन पण आलेच.
सी-डॅकचा तांत्रिक सल्ला व भारताच्या आयटी खात्यातील अज्ञान यांचा संगम झाला. यांच्यापैकी कुणीही स्वतः इनस्क्रिप्ट वापरले नसल्याने त्यातील बारक्या बारक्या छान खुबी व युक्त्या त्यांना कळतच नव्हत्या. युनीकोड मधील कुणीतरी गोऱ्याने मत मांडले की BIS मधे थोडा बदल करा-- एकातून दुसऱ्या लिपीत लिप्यंतरण होऊ देऊ नका. भारताने याचा लग्गेच स्वीकार केला. चीनी-जपानी-कोरियाई देशांच्या देखील लिप्या वेगळ्या पण वर्णमाला एकच आहे. त्यांनाही हाच फॉर्म्यूला सांगितला . तो त्यांनी साफ धुडकावला. मग अरेबिक वर्णमाला असणाऱ्या पण लिखाणात थोडाफार फरक असलेल्या देशांनी पण त्यांचा सल्ला धुडकावला. त्यामुळे त्यांचे लिप्यंतरण क्षणात होऊन जाते. (याचा प्रकाशनात खूप फायदा असतो). पण ज्या भारतीय लिप्यांची एकात्मता तांबेंनी विचारपूर्वक जपली ती युनीकोड व सी-डॅकने मिळून मोडीत काढली. आता तुम्ही देवनागरीत भगवद्गीता लिहिलीत तर बंगाली वाचकासाठी पुन्हा बंगालीत टाइप करावे लागते हा गीतााा-प्रेसचा दुःखद अनुभव आहे.
दुसरा प्रॉब्लेेम मायक्रोसॉफ्टच्या गुर्मीतून आला. भारतात त्यांचे एकछत्र मार्केट होते. त्यांनी त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टम मधे भारतीय भाषांना युनीकोड सपोर्ट नाकारला. आंशिक सुदैव असे की त्याच सुमारास मायक्रोसॉफ्टची प्रतिस्पर्धी लीनक्स ऑपरेटिंग सिस्टम रिंगणात उतरली. ती फ्री डाऊनलोडेबल तर होतीच शिवाय भारतीय भाषांना बाय डिफॉल्ट युनीकोड सपोर्ट देत होती. १९९७ ते २००० या काळात जी जी इन्स्रिप्ट वापरणारी चार पाच हजार माणसे (फक्त) भारतात होती त्यांनी हिरिरीने लीनक्सचा प्रचार केला.-- ती सिस्टम मायक्रोसॉफ्टपेक्षा बरीच अॅडव्हान्स असल्याने सामान्य वापराला ती किचकट वाटते तरीही इनस्क्रिप्ट मुळे ती आपले मार्केट खाणार हे ओळखून मायक्रोसॉफ्टने राकृंना कॉण्ट्रक्ट देऊन प्रत्येक भारतीय लिपीसाठी एक नवा फॉण्ट करवून घेतला व २००३-०४ मधे मंगल या नावाने तो विण्डोज एक्सपी ही नवी सिस्टम घेणाऱ्यांसाठी उपलब्ध केला. लीनक्सही मार्केट सपोर्ट कमी राहिल्याने मागे पडली.
सीडॅकनेही सरकारी आदेशांचा वापर करून इझम सॉफ्टवेअर सर्व सरकारी कार्यालयांच्या माथी मारले पण ते युनीकोड कम्पॅटिबल नसल्याने इंटरनेटवर जंक होत असते. सबब कोणतीही सरकारी वेबसाइट मराठीतून करता येत नाही, व पीडीएफ वापरून केलीच तर ती सर्चेबल असत नाही. मार खाणारा दुसरा ग्रुप म्हणजे प्रकाशन संस्था. त्यांचा वेग इतर देशातील प्रकाशनांंच्या मानाने पाच ते दहा पट मागे पडतो.
कारणे व चुका काहीही असोत पण देशांतील भाषांचा संगणकीय वापर खुरटला तो खुरटलाच. प्रभावहीन इम्प्लीमेंटेशनमुळे राकृ व तांबे हे दोघेही पद्मश्री सन्मानाच्या तोडीचे काम करूनही त्यास मुकले.

Tuesday, July 11, 2017

2006 -- Releasing OpenOffice.org 2.0 in 7 Indian Languages

Hrishikesh (हृषीकेश मेहेंदळे) hashinclude@gmail.com

12/4/06
leenaमुझे
FYI //

---------- Forwarded message ----------
From: RKVS Raman <rkvsraman@gmail.com>
Date: Apr 11, 2006 9:02 AM
Subject: [MarathiOpenSource] Releasing OpenOffice.org 2.0 in 7 Indian Languages

Hi all,


The BharateeyaOO.o Group ( http://www.cdacbangalore.in/bharateeyaoo )
of CDAC Electronics City Bangalore announces the availability of
OpenOffice.org 2.0.1 language packs in 7 Indian Languages.

The languages are

1) Assamese
2) Gujarati
3) Hindi
4) Malayalam
5) Marathi
6) Oriya
7) Urdu

Out of these languages Hindi has been jointly done by us and Rajesh
Ranjan and Gujarati has been translated by Utkarsh (
http://www.utkarsh.org ).

Special credits have to be given to GIST Group CDAC Pune (
http://www.cdac.in/html/gist/gistidx.asp ) for translating for the
rest of the 5 languages.

The Urdu Language Pack supports RTL interface.

The language packs have been made available for Linux (Debian and Red
Hat) and Windows.

The merged source is also made available.

Please download from http://www.cdacbangalore.in/bharateeyaoo/download.shtml

संगणकावर देवनागरी वर्णमालेच्या आधाराने मराठी VIVEK

संगणकावर देवनागरी वर्णमालेच्या आधाराने मराठी

स्रोत: विवेक मराठी  01-Dec-2014

****लीना मेहेंदळे****

टाईपरायटरचे युग असताना टाइपिंग येणे हे निव्वळ एक कौशल्य होते. ते पोटापाण्यासाठी अर्थार्जनाचे साधन होतेपण ज्ञानार्जनाचे नव्हते. मशीनच्या यांत्रिक मर्यादेमुळे टाइपराइटरची कळपाटी (की-बोर्ड) उल्टीपुल्टी होतीपण तीच शिकून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कामचलाऊ टाइपिंग येण्यासाठीसुध्दा किमान महिनाभराचा सराव लागायचा आणि ज्यांचे अडलेले नसेल ते त्या वाटयाला जात नसत. मराठी व भारतीय लिप्यांबाबत या यांत्रिक मर्यादा अधिक होत्याम्हणून मराठी टाईपरायटर शिकणे त्याहून किचकट होते - एवढे जनरल नॉलेज सर्वांकडे आले.
टाईपरायटरचे काम करू शकणारेशिवाय सोबत इतर असंख्य कामे करू शकणारे संगणक (कॉम्प्युटर) नावाचे यंत्र आले आणि त्याने ज्ञानार्जनाचे व द्रुतगती संदेशवहनाचे रस्ते खुले केले. सुरुवातीपासून (सुमारे 1945पासून) ते 1985पर्यंत त्यावर फक्त रोमन वर्णमाला लिहिण्याची सोय होती आणि तीदेखील त्याच उल्टयापुल्टया कळपाटीनुसार! पण आता ते शिकून घेण्यात कित्येक मोठया संधीप्रेस्टिज व कार्यक्षमता दडलेल्या होत्या आणि ज्यांना ज्यांना संगणक-सोइचे महत्त्व पटलेत्यांनी ती कळपाटी शिकून घेतली. अशा लोकांमध्ये सरकारातील मध्यम व उच्च श्रेणीचे अधिकारी मोठया प्रमाणावर होते.
1985-1995 या काळात संगणकावर मराठीचा वावर सुरू झालातोही मराठी टाईपरायटरच्या किचकट कळपाटीच्या आधारानेच - 'रेमिंग्टन की-बोर्डहे जिचे नाव एव्हाना रूढ झाले होते. त्यामुळे ज्यांनी ज्ञानप्रेस्टिजकार्यक्षमता इ.साठी रोमनचा किचकट की-बोर्ड शिकून घेतला होतात्यांच्याकडे त्याहून किचकट असा मराठीचा की-बोर्ड शिकण्याचे धैर्य नव्हतेत्यामुळे जितक्या टाइपिस्ट-क्लार्कने पूर्वी मराठी टाईपरायटर शिकला व वापरला होतातेवढेच आताही मराठी संगणक वापरू शकत होते. त्यातच 1995मध्ये इंटरनेटचा वापर सुरू झालातेव्हा ते मराठी इंटरनेटवर चालत नाही ही भलीमोठी उणीव दिसली. यामुळे संगणकावर मराठी शिकण्याचा विचार मागे पडत राहिला. त्याऐवजी भाषा मराठी पण दृश्य अक्षरे रोमन हा पर्याय - म्हणजे tu kuthe jatosअसे लोक लिहू लागले. वाचणारेदेखील tu kuthe jatosअसे रोमनमध्ये वाचून त्यातील मराठी भाव समजून घेऊ लागले. आणि 2004मध्ये एक दिवस काँग्रेस राज्य आले. 1995 ते 2004 या काळातील अपयश लपवण्याला वाव निर्माण झाला.
काय होते ते अपयश?
1991मध्ये सीडॅकने एक उत्कृष्ट कळपाटी डिझाइन तयार केले. त्याला मी 'वर्णमाला-अनुसारीकिंवा 'बालसुलभ कळपाटीम्हणतेकारण आपण शाळेच्या पहिल्या इयत्तेत शिकतो त्याप्रमाणेच अनुक्रम असलेली - म्हणजे अआइईउऊएऐओऔ किंवा कखगघङअशी एकासोबत एक अक्षरे असलेली आणि आणि सबब मराठी टाईपरायटरचा किचकटपणा समूळ काढून टाकलेली अशी ती कळपाटी होती. तिला नाव दिले 'इनस्क्रिप्ट'. पण जुन्या काळापासून चालत आलेला रेमिंग्टन की-बोर्डही त्यांनी पर्यायी राहू दिला. हेतू हाकी जुने मराठी टाइपिस्ट रेमिंग्टनचा पर्याय वापरतील आणि नवे लोक इनस्क्रिप्ट वापरतील. मग सीडॅकला एकाएकी बिझनेस आठवला आणि देशाच्या संपत्तीवर पोसलेल्या पगारी वैज्ञानिकांनी हे नवे सॉफ्टवेअर विक्रीस काढले. पण बाजारातील इतर रेमिंग्टन-आधारित मराठी सॉफ्टवेअर्स थोडी स्वस्त (12000 रु.)तर यांनी जास्त (15000 रु.) किंमत लावली. ते लावताना आमची इनस्क्रिप्ट नव्या लोकांना किती उपकारीहे सांगायला विसरले. ते बहुधा मार्केटिंग तंत्र शिकले नव्हते. त्यांना कंट्रोल करणारे केंद्र सरकारातील अधिकारीही राजीव गांधींच्या नव्या बिझनेस संस्कृतीमध्ये रंगलेले होते. संगणकावर भारतीय भाषांना प्रोत्साहन महत्त्वाचे की पैसायामध्ये पैसा जिंकलाहे पहिले अपयशकारण हे कमी किंमतीला दिले तर भारतीय भाषा वेगाने संगणकावर आरूढ होतीलहेच ओळखता आले नाही. शिवाय पैसाही प्रत्यक्ष मिळाला नाहीकारण मार्केटिंग जमेना.
मग फतवा काढून सर्व सरकारी कार्यालयांना ते सॉफ्टवेअर घेणे अनिवार्य केले आणि सीडॅकने आपण किती पैसा कमवला म्हणून पाठ थोपटून घेतली. पण त्या सॉफ्टवेअरमध्ये अतिसोपी अशी वर्णमाला अनुसारी कळपाटी आहे असे कितींना कळले आणि कितींनी ते वापरायला सुरुवात केलीती टक्केवारी आजदेखील फार कमी आहे - हे दुसरे अपयश.
1997-2000 या काळात लीनक्स-युनिकोड या जोडीने इनस्क्रिप्टचा सोपा की-बोर्ड आणि इंटरनेटस्नेही असे सॉफ्टवेअर फ्री डाउनलोडसाठी उपलब्ध केले. मात्र लीनक्सचा भारतातील शिरकाव हळूहळूच होणार होता. त्या तुलनेत आधी इथे आलेल्या मायक्रोसॉफ्टनेही आपण मागे पडू नये म्हणून तसे पॅकेज विंडोज एक्सपीमध्ये व विंडोज 7मध्ये दिलेपण फारशी माहिती न देता. त्यामुळे अजूनही tu kuthe jatosअसेच लिहून तसेच वाचले जात होते. लीनक्स-मायक्रोसॉफ्टची नवीन माहिती लोकांना मोठया प्रमाणावर झाली असतीतर सीडॅकचे अपयश अजून ठळठळीत दिसले असतेकारण त्यांचे सॉफ्टवेअर अजूनही इंटरनेटवर चालत नव्हते. पण तेवढयात काँग्रेस राज्य आले.
काँग्रेस राज्य आले आणि भारतीय लिप्या मागे ओढण्याचे पर्व सुरू झाले. लोकांना समजवण्यात आले की ''तुम्ही रोमनमधूनच लिहा पण दृश्य अक्षरे मराठी असतील अशी युक्ती तुम्हाला देतो - म्हणजे तुम्ही tu kuthe jatos? लिहा आणि संगणकाच्या पडद्यावर ते 'तू कुठे जातोस?' असे दिसेल.'' लोकांनी हे सर्व कधी नाइलाजानेतर कधी आनंदाने स्वीकारलेकारण संगणकावर तो जुनाकिचकटउल्टापुल्टा की-बोर्ड न वापरता विनासायास हिंदी-मराठी शिकता येईल असा की-बोर्ड असू शकतोही कल्पनाच फार लोकांना सुचली नाहीकिंवा तिचा शोध घ्यावा असेही सुचले नाही. अगदी सीडॅकचे कंट्रोलिंग म्हणवणारे गृहखाते असो की राजभाषांसाठी कटिबध्द आहोत असे सांगणारे राजभाषा खाते असो - अशी पध्दत 1991मध्येच अस्तित्वात आली आहेती सीडॅकनेच आणली आहे याची कदाचित त्यांनाच माहिती नव्हतीआणि जाणून घेण्याची जबाबदारी आहे ही जाणीवही नव्हती. त्यामुळे तिचा प्रचारच झाला नाहीहे देशाचे आणि मराठीचे दुर्दैव. ती आहे, 1991पासून होती, 1998पासून तर ती मोफत आणि इंटरनेटवर टिकण्याच्या सोयीसकट आली होती किंवा 2002मध्ये ती विंडोजवर मोफत आल्यामुळे तिची उपलब्धताही खूप - म्हणजे खूप सुगम झाली होतीहे सांगण्याइतके तांत्रिक ज्ञानही त्यांना नव्हते. आणि उत्साह तर कदाचित त्याहूनही कमी होता.
अपयश लपवण्यासाठी
मग सीडॅकने 2005मध्ये 'रोमन लिखे - हिंदी दिखेया पध्दतीचे सॉफ्टवेअर विज्ञान भवनात जंगी कार्यक्रम करून व सोनियाजींच्या हस्ते त्याचा शुभारंभ करून त्याच्या एक कोटी सीडीज मोफत वाटल्या
(संदर्भ - Annual Report - Centre for Development of Advanced ...
In Multilingual Computing, C-DAC launched free CDs containing Indian Language ..... Smt.Sonia Gandhi, Chair ... The language software tools and fonts CDs are distributed free of cost through ...... Release of Hindi Software Tools and Fonts was organized by C-DAC, Noida at Vigyan Bhawan, New Delhi, on June 20, 2005.)
लक्षात घ्या की तेव्हाच त्यांना 'मराठी लिखे- मराठी दिखे', किंवा 'बंगाली लिखे तो बंगाली दिखेया प्रकारच्या सीडीही वाटता आल्या असत्या. आपल्याकडील वैज्ञानिक टॅलेंट उत्तम आहे यात शंका नाहीपण राष्ट्रीय दृष्टी मात्र कमी पडत होतीहेही तितकेच खरे.
म्हणून असे झाले की आता रामाचे नाव घेतले की आपल्याला र हे भारतीय अक्षर नाही आठवताततर आरत्यापुढे एत्यापुढे एम ही अक्षरे आठवात. अशी ही भारतीय वर्णमाला विसरण्याची नांदी तर झाली बुवा!
खरे तर वर्णमाला अनुसारी इनस्क्रिप्ट कळपाटी शिकणे किती सोपे आहेते वरील चित्रावरून लगेच कळून येईल.

म्हणून जे लोक अजूनही रोमनमधून मराठी लिहितातत्यांना सांगावेसे वाटते की ''बाबांनोनिरुपाय होतामाहिती नव्हती तेव्हा रोमनचा आधार घेऊन का होईनामराठी भाषेत लिहीत राहिलात - कौतुक आहे तुमचं. पण आता आपल्या वर्णमालेवर आधारित अत्यंत सोपी व इंटरनेटवर टिकेल अशी पध्दत सुगमतेने उपलब्ध आहे. अगदी मामुली सरावाने ती तुम्हाला जमणार आहे. म्हणून आतातरी आपली वर्णमाला रोमनच्या तुलनेत हरवू नयेयासाठी थोडा विचार करा.''
अर्थात शेवटी मला सुमारे 30 वर्षांपूर्वीचे एका आयएएस सहकाऱ्याचे शब्द आठवतात - ''मी मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घातले आहेम्हणजे त्यांना मराठी-हिंदी का आली नाही हा प्रश्नच नको. आम्ही घरात त्यांच्याशी कटाक्षाने इंग्लिशच बोलतो. त्यांना शिकून अमेरिकेतच जायचे आहे. प्रगतीश्रीमंती सर्व काही तिथेच आहे. इथे राहायचंय कोणाला आणि कशाला?''
अशांचा राग नाहीपण आपली भाषालिपी आणि अत्यंत वैज्ञानिक अशी आपली वर्णमाला विसरली जाऊ नयेमृत होऊ नयेचिरंतन टिकावीम्हणून इथे राहिलेल्यांनी तरी मराठी लिहिताना ती देवनागरी वर्णमालेच्या आधारानेच लिहावी.
9869039054
leena.mehendale@gmail.com

Sunday, May 21, 2017

संस्कृतं च संंगीतं च

संस्कृतं च संगीतं च
--- लीना मेहेंदळे
दि २१ मे २०१७

संस्कृत और संगीत दोनों ही विशिष्ट भारतीय शब्द है और उन दो विषयों को इंगित करते हैं जिनका आपस में घनिष्ठ संबंध है

मूल शब्द संस्कार से संस्कृत शब्द बना है संस्कार का अर्थ है ऐसी प्रक्रिया जिसमें सब कुछ अच्छा हो, सुफल हो प्रिय हो, गुणवान हो, सौंदर्यवान हो, नीतिवान हो ऐसी प्रक्रियाएँ अपने आप प्रकट नहीं होती वरन चिंतन के द्वारा उनकी अन्वेषणा की जाती है इस प्रकार चिंतन द्वारा संस्कार मनुष्य पर संस्कार ताकि उसका जीवन समाजोपयोगी हो, पशु व वृक्षों पर संस्कार ताकि वे दीर्घजीवी और आरोग्ययुक्त हो, इत्यादि हमारी परंपरामें आरंभसे ही है भाषा भी संस्कारित हुई तो संस्कृत बनी कभी-कभी एक उपालंभभरा वाद चलता है कि संस्कृत से प्राकृत भाषाएँ बनी या प्राकृत से संस्कृत दोनोंके पक्षमें तर्क दिए जा सकते हैं संस्कृत की प्राथमिकता के पक्ष में भी तर्क है हमारे सारे दर्शन, सारे ग्रंथ इस बात का इंगित करते हैं कि हमारे ऋषि मुनियोंमें सटीकता (exactitude) की परंपरा थी और क्यों न हो। जब सटीकता होती है तभी ज्ञान-वृद्धि की गति एवं व्याप्ति अतिशीघ्र हो सकती है इसी सटीकता के कारण कोई आश्चर्य नहीं कि हमारे ऋषि-मुनियों की भाषा अतिप्राचीन कालसे ही संस्कारित रही हो।

सटीकता और संस्कृति की इतनी गहराई से चर्चा करनेका कारण है इस देशमें जो संगीत उपजा है उसमें भी वही संस्कार और वही सटीकता है, वही सूक्ष्मातिसूक्ष्म विवेचन है यूं कहा जाए कि संस्कृत और संगीत दोनों ही प्रवृत्तियां एक जैसी ही हैं और एक दूसरे के पूरक भी इसी घनिष्ठ संबंधकी हम विस्तृत चर्चा करने जा रहे हैं

संस्कृत में भाषा की सटीकता के लिए कई संस्कार हुए जो हम प्रत्यक्षतः देख सकते हैं और सरलता से उसका आकलन भी कर सकते हैं हमारे व्याकरण की बातों को गौर से देखिए शब्दों के शब्दरूप, उनमें लिंग-भेद, वचन-भेद, द्विवचन का प्रयोग, काज्ञानके लिए क्रियाओंमें लकारों का प्रयोग, संधि व समास, तथा उपसर्ग और तद्धितादि प्रत्यय, बस इतनेसे ही व्याकरणके पाठ होते हैं लेकिन इनमेंसे प्रत्येक पाठ अपने आपमें विस्तृत है, नियमबद्ध है, और यही सुदृढता है जो संस्कृतकी सटीकताको संभाल कर रखती है

संस्कृतके व्याकरण शास्त्रके साथ ऋषि-मुनियों ने ध्वनि शास्त्र को भी समझा और उसका विस्तार से अध्ययन किया अनादि ब्रह्मांड में ध्वनि की उत्पत्तिसे ही सृजनका प्रारंभ हुआ इस रहस्यको हमारे ऋषियोंने अपने चिंतन द्वारा जाना। उन्हें तत्वचिंतन के साथ तत्वदर्शन भी हुआ तब उनकी पकड़में आया कि ध्वनि शास्त्र और शरीर शास्त्रके बीच साथ गहरा संबंध है। मनके भावोंके प्रकटीकरणके लिए चिंतनके स्तर पर चार सीढ़ियां हैं -- परा, पश्यंति, मध्यमा और वैखरी। परंतु शरीरके स्तरपर अक्षरो व नादका सृजन होता है शरीरके भिन्न भिन्न स्थानोंसे निकली अक्षर-ध्वनियां भिन्न भिन्न होती हैं

सी बात का आधार लेकर कुंडलिनी मार्गके चक्रों पर भिन्न-भिन्न अक्षरोकी उपस्थिति का दर्शन हमारे मनीषियोंने किया उस उस अक्षर के कंपन द्वारा उस उस चक्र को गुँजाने से जो अलग-अलग प्रभाव उत्पन्न होते हैं उनके अध्ययनसे मंत्र विद्याका जन्म हुआ इसी रहस्यसे गान विद्याका भी जन्म हुआ। वैखरी वाणीमें जो ध्वनि उच्चारण होता है उसके आधार पर वर्णमालाकी निश्चिती हुई और वर्गीकरण भी इस प्रकार ऋषियोंने सोलह स्वरों की अनुभूति की तत्पश्चात् व्यंजनोंमें भी कंठ वर्गके व्यंजन, तालव्य, मूर्धन्य, दंत्य और ओष्ठ वर्ण के व्यंजन इत्यादि वर्गीकरणसे हमारी वर्णमाला बनीका प्रचलन समस्त दक्षिण आशिया खंडके सभी देशोंमें रहा आज भी कोरियातक की भाषाओंमें, जैसे नेपाली, र्मी, था, भूटानी, तिब्बती, सिंहली आदि में भी यही वर्णमाला प्रचलित है

व्याकरणशास्त्र मंत्रशास्त्रके साथ साथ संस्कृतका छंदशास्त्र भी अत्यंत व्यापक है नाद, लय, ताल, छंद, आदि के उद्गाता स्वयं भगवान शिव ,हेये है इन्हीं के कारण सौंदर्यकी तथा ललित कलाओंकी सृष्टि होती हैयके साथ अपने आप ही गायन, वादन और नृत्य भी जुड़ जाते हैंका गहन संबंध मनोउर्जा के साथ है छंद शास्त्रके साथ-साथ संगीत गायनकलाका भी उदय और विस्तार हुआ

षियोंने प्रकृति के रहस्यों का वे लेते हुए जिन अगणित ऋचाओंका दर्शन किया उन्हें अगली पीढ़ियों तक पहुंचानेके हेतु गान-परंपरा एक सशक्त माध्यम बनी जनमानस के आकलन के लिए व्याकरण, ध्वनि-शास्त्र अथवा छंद-शास्त्र की अपेक्षा गायन विद्या अधिक सुगम एवं सरल सिद्ध हुई इसी कारण परा पश्यंती इत्यादि अवस्थाओंकी देवता जो वाग्देवी हैं, उनका मूर्त रूप सदैव वीणाके साथ ही होता है वीणा, डमरु एवं वेणु -- ऐसा माना जाता है कि सभी वादयों तथा संपूर्ण गायन कलाकी उत्पत्ति न्ही तीन वादयोंसे हुई है हमारे ग्रंथोंमें गान विद्यासे संबंधित गंधर्व-, सिद्ध-गण, यक्ष-गण तथा अप्सरा-गण इत्यादि गणोंका वर्णन है जिन्होंने गान कला का अध्ययन, विस्तार एवं प्रचार किया इनके प्रमुख अधिपतिके रूपमें गणपति प्रतिष्ठित हैं

ऋग्वेद आदि वेदोंको पीढ़ी-दर-पीढ़ी पहुंचाने के लिए श्रुति परंपरा चली उसमें अशुद्धता आनेका संकट था अशुद्ध मंत्रों से फलकी प्राप्ति नहीं हो सकती -- ठीक उसी प्रकार जैसे अव्यवस्थित रूप से की गई प्रक्रियाओंसे अच्छा उत्पादन नहीं निकल सकता अशुद्धताके संकटको टालनेके लिए एक अद्भुत तरीकेकी रचना हुई ऋचाओंमें उदात्त, अनुदात्त और स्वरित ध्वनियों के आचरण के रण उनकी गेयता बढी और मंत्र सामर्थ्य भी फिर उन ऋचाओंको पदोंमें विभक्त किया गया उनकी पाठ विधियां बनी जो सरलसे कठिन और कठिनसे कठिनतर होती गईं। इस प्रकार पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ और घनपाठ का चलन प्रारंभ हुआ पदपामें हर पदको अपनी स्थितिनुसार गाया जाता है परंतु क्रमपामें दो पदोंको उलट फेर कर गाया जाता है जटापाठमें तीन पदोंको और घनपाठमें चार पदोंको उल्टा पुल्टा कर गाया जाता है इस शास्त्रके साथ ही किसी पडावपर सप्तसुरोंका भी प्रकटीकरण हुआ होगा ऐसी मेरी मान्यता है

हमारे ग्रंथ बताते हैं कि स्वरोंकी स्थितियोंको प्राणियोंके स्वरोंके साथ सिद्ध किया गया है कोकिलके स्वरसे पंचम, हाथीके स्वरसे धैवत और मयूरके स्वरसे निषाद सिद्ध होते हैं इसी प्रकार ऋषभ, गंधार और मध्यम भी सिद्ध होते हैं षड्ज की उत्पत्ति अन्य छः सुरोंसे से होती है इसलिए उसे षड्ज कहा गया है।

स्वरोंको कंठमें ध्रुवतासे स्थापित करने के लिए हर एक स्वरकी साधना आवश्यक है इसी प्रकार र, राग एवं सौंदर्य की उत्पत्ति के लिए उनका उलटफेर गायन भी कंठस्थित होना चाहिए इस उलटफेरका क्रम भी दो स्वर, तीन स्वर और चार स्वरों के साथ उसी प्रकार गाया जाता है जैसी वेदोंके पदोंकी उलटफेर करनेकी पद्धति है जैसे पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ और घनपाठ की सिद्धता होती है उसी प्रकार सप्तसुरोंकी आलाप एवं तानकी विधियाँ हैं। 

अतएव कहा जा सकता है कि हमारे मनीषियोंने पूरी तरह सोच विचार कर ही गानसाधना और ज्ञानसाधनाको एक दूसरेका पूरक पाया, उनकी एकत्रित उपासना की विधियां नियुक्ति कीं। उनका स्मरण, उनका अभ्यास, अभिव्यक्ति और अनुभूति एक साथ गुथे हुए हैं। जहाँ वेदोंमें निहित ज्ञानसाधना मानवको मोक्ष तक ले जाती है, वहीं संगीत-साधना भी समाधि-दर्शनकी अनुभूति दे जाती है। इस प्रकारसे भारतकी संस्कृति, भारत की संस्कृतोद्भव भाषाएं तथा भारतीय संगीतका एक अभिन्न नाता है, जिसका सही-सही आकलन हमने शायद अभी तक नहीं किया है हमारा सेमिनार इस दिशा में आगे भी कार्यरत रहे, शोधप्रवर्तक बने और सफल होता चले यही शुभकामना

-----------------------------------------------------------------------------------------

Tuesday, May 16, 2017

२०१७ -- फर्गसन कॉलेज व परमहंसनगर

कौशलम् चे लेटरहेड
दि. ०३-०५-२०१७  
 प्रति,
माननीय डॉ. श्रध्दा प्रभुणे-पाठक
(नगरसेविका,प्रभाग क्र-१०)
                   विषय- शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी टायपिंग शिकविण्याबाबत.

महोदया,
    २०१७ च्या निवडणुकीमध्ये आपण नगरसेवक पदी निवडून आल्याबद्दल प्रथमतः आपले मनपूर्वक आभिनंदन.
          कौशलम् न्यासच्या प्रमुख संरक्षिका, श्रीमती लीना मेहेंदळे यांच्या चर्चेच्या अनुषंगाने हे पत्र कौशलम् न्यासाच्या वतीने पाठवीत आहे. कौशलम् न्यासाच्या उद्दिष्टांमध्ये संस्कृत व प्रादेशिक भाषांचे संवर्धन हे प्रमुख उद्दिष्ट आहे व त्यासाठी संगणकावर भारतीय भाषांना सरसकट एकसारखेपणाने लागू होणारा इन्स्क्रिप्ट किबोर्ड प्रचारात आणण्यासाठी कार्यक्रम घेतले जातात. या उपक्रमाची गरज विद्यालयांमध्ये देखील आहे कारण या कौशल्यशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील जीवनामध्ये निश्चितपणे  होऊ शकतो.
    कौशलम् ट्रस्ट व आपल्या सहयोगाने असे उपक्रम घेतले जाऊ शकतात. आपल्या विभागातील महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये प्रथम हा उपक्रम घेतला जावा, असा आमचा प्रस्ताव आहेहा उपक्रम १२ दिवसांचा (२ आठवडे) असेल सोमवार ते शनिवार या दिवसांत दररोज १ तासाचा कालावधीचा असेल. हा उपक्रम गरजेचा आहे हे आपणास संलग्न टिप्पणी वरून पटेल. सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही आपणांस भेटू इच्छितो.
कळावे ही विनंती,
धन्यवाद,
 कौशलम् ट्रस्ट.
१) प्राची लुष्टे
२) अमित मोकर
(फोन.नं. ०२०-२५३८३४७२) 

टिपणी संलग्न.
टिपणी:

विद्यालयामध्ये सुलभ मराठी टंकलेखनाबाबत जाणीव व जागृती निर्माण करणेः-

            मराठी विद्यालयामध्ये पुष्कळसा लेखी व्यवहार हा मराठीतूनच होतो. त्यामूळे संगणक हा विद्यालयीन कामासाठी वापरायचा झाला तर शक्य असेल त्या सर्वांना  संगणकावर मराठी लिहीता यायला हवे. खासकरून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणकावर मराठी टायपिंग शिकण्याची उपयुक्तता फार आहेसंगणकात यासाठी काय सोय आहे ते समजून त्यांना हे शिकता येऊ शकेल
            इंग्रजी कि-बोर्ड हा टाईपरायटर व संगणकामध्ये एकसारखाच असतो. जरी तो लक्षात ठेवायला थोडा अवघड असला तरी संगणकावर तोच असल्यामूळे तो की-बोर्ड लक्षात ठेवण्यावाचून पर्याय नसतो. परंतू मराठी टंकलेखनाची माहिती मराठी शाळेतील शिक्षकांना फारशी असत नाही.
            संगणकावरील मराठी टंकन करण्यासाठी इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखन हा सरळ व सोप्या पद्धतीचा पर्याय आहेते शिक्षण शालेय मुलांना द्यावे. आम्ही प्रस्तवित केलेल्या उपक्रमाचा उद्देश सरळ व सोप्या पद्धतीचे इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखन हे आपल्या विद्यार्थ्याना कसे अवगत करता येईल असा आहे.
सोपा का ?
            यामध्ये मराठी वर्णमालेनुसार की-बोर्डची मांडणी केली आहे. त्यामुळे की-बोर्डवरील मराठी अक्षरांचे क्रम लक्षात ठेवण्यची कटकट संपते व अतिशय सोप्या पद्धतीने लोकांना इंग्रजी की-बोर्ड माहीती नसताना ही मराठी टंकनलेखन अवगत करता येते.
            या टंकलेखनाचे वैशिष्ठ्य म्हणजे डाव्या बाजूला स्वर, काना, मात्रा तर उजव्या बाजूला सर्व व्यंजने आहेत. त्यामूळे एका-आड एक दोन्ही हाताच्या चार-चार अशा आठही बोटांनी टंकनलेखन केले जाऊन, टंकलेखनाचा वेग वाढवण्यास देखील मदत होते.
उपक्रमाचे स्वरूपः-
·                    हा उपक्रम १२ दिवसांचा (२ आठवडे) असेल.
·                    सोमवार ते शनिवार या दिवसांत दररोज १ तासाचा कालावधीचा असेल.
·                    शाळेमध्ये किमान ५ संगणक असणे गरजेचे आहे,
·                    ३ विद्यार्थ्यांसाठी एक संगणक असेल,
·                    अशा प्रकारे एका बँच मध्ये किमान १५ विद्यार्थी असतील.
·                     संगणक संख्या कमी असल्यास दोन बँच घेतल्या जावू शकतात.
·                    कोशलम् न्यासाच्या वतीने दोन प्रशिक्षक काम करतील.

 अशा प्रकारे उपक्रमाचे स्वरूप असेल
-------------------------------------------
कौशलम् चे लेटरहेड
या पत्राची प्रत जयंत सहस्रबुद्धे (विज्ञान भारती) यांना ईमेल केली
 दिनांक-०५-०५-२०१७
प्रति,
मा. मुकुंद देशपांडे
संयोजक- भारतीय विज्ञान संमेलन, Expo,
 पुणे-४११००४
            विषयः- मराठी टायपिंग शिकविण्याच्या सोप्या पद्धतीचे प्रात्यक्षिक यासाठी स्टॉल मिळण्याबाबत.
महोदय,
    कौशलम् न्यासच्या प्रमुख संरक्षिका, श्रीमती लीना मेहेंदळे व प्रा. विनय चाटी यांच्यात चर्चा झाली असता. या चर्चेच्या आधारे आम्ही आपल्या बरोबर ०४-०५-२०१७ रोजी भेट घेतली.
   भेटीच्या अनुषंगाने हे पत्र कौशलम् न्यासाच्या वतीने पाठवीत आहे. कौशलम् न्यासाच्या उद्दिष्टांमध्ये संस्कृत व प्रादेशिक भाषांचे संवर्धन हे प्रमुख उद्दिष्ट आहे व त्यासाठी संगणकावर भारतीय भाषांना सरसकट एकसारखेपणाने लागू होणारा इन्स्क्रिप्ट किबोर्ड प्रचारात आणण्यासाठी कार्यक्रम घेतले जातात. या उपक्रमाची गरज महाविद्यालयांमध्ये देखील आहे कारण या कौशल्यशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील जीवनामध्ये निश्चितपणे होऊ शकतो. तसेच Expo ला भेट देणारे सामान्य लोक, ही पद्धत ५ ते ६ मिनिटात सुद्धा शिकू शकतात. त्यामुळे याला महत्वप्राप्त झाले आहे.
     मराठी टायपिंग शिकविण्याची इनस्क्रिप्ट ही एक सोपी पद्धत असल्याने ही पद्धत सर्वांना अवगत होण्यासाठी कौशलम् ट्रस्ट कार्यरत असते. कौशलम् ट्रस्ट च्या द्वांरे अशा प्रकारचे अनेक उपक्रम हाती घेतले जातात. आपल्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही मराठी टायपिंग प्रात्यक्षिकासाठी स्टॉल लावू इश्चितो. स्टॉल लावण्या संदर्भात काही अटी व नियम असतील ते आपण आम्हाला कळवावे.
कळावे हि विनंती,
धन्यवाद,

कौशलम् ट्रस्ट.
) प्राची लुष्टे
) अमित मोकर
(फोन.नं.०२०-२५३८३४७२)
sp;    संगणक संख्या कमी असल्यास दोन बँच घेतल्या जावू शकतात.

·                    कोशलम् न्यासाच्या वतीने दोन प्रशिक्षक काम करतील.
  अशा प्रकारे उपक्रमाचे स्वरूप असेल
------------------------------------------------------------------